नांदेड : कौटुंबिक वादातून दारुड्या पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून करुन स्वतः शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरंगल येथे घडली. सदर प्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरुन मयत वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नायगाव हे तालुक्याचं गाव… तिथून 15 कि.मी अंतरावर असलेल्या नरंगल येथे शुक्रवारी सकाळी पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने पंचक्रोशीत चांगलीच खळबळ उडाली.
सदरच्या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रामराव पडवळ व उपनिरीक्षक बाचावार हे फौजफाट्यासह नरंगल येथे पोहचले. त्यांनी घटनेची सगळी स्थिती जाणून घेतली.
मुकींद भुजंग पट्टेकर हा दारुच्या नशेत नेहमीच पत्नीला मारहाण करुन भांडण करत होता. गुरुवारी रात्रीही शेतीच्या वादातून पत्नी रेणूकाबाई सोबत वाद झाला. पण हा वाद नेहमीचाच असल्याने रेणूकाबाई ही शुक्रवारी सकाळी शेतात असलेल्या जणावराचे दुध काढण्यासाठी सकाळी 5 वाजताच्या दरम्यान शेताकडे गेली होती. पत्नी शेतात गेली असल्याची संधी साधून तो ही पत्नीच्या मागेच शेतात गेला आणि धारधार शस्त्राने पत्नीचा शेतातच खून केला.
पत्नी जाग्यावरच मृत्यू पावल्यानंतर त्याने दुसऱ्याच्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गावात समजताच अनेकजण घटनास्थळी धाव घेतली होती. तर काहींना या घटनेबाबत नायगाव पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक रामराव पडवळ यांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा करुन दोघांचेही शव विच्छेदनासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले.
पत्नीचा धारधार शस्त्राने केला खून नंतर गळफास घेवून पतीची आत्महत्या…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
RELATED ARTICLES