HomeBreaking Newsदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: दहावीचा निकाल जुलैमध्ये, आजपासून विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनास सुरुवात...

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: दहावीचा निकाल जुलैमध्ये, आजपासून विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनास सुरुवात…

दहावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन करण्याची प्रक्रिया १० जून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. आज शिक्षक व मुख्याध्यापकांना मूल्यमापन कार्यपद्धतीचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे.

दहावीच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम 10 जून ते 3 जुलैपर्यंत चालणार असून त्यानंतर जुलैमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

*मूल्यमापन प्रक्रिया व महाविद्यालयांसाठीचे नियम*

★ नियमित विद्यार्थ्यांचा नववीचा निकाल आणि दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन तसेच तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे विषयनिहाय गुणदान केले जाईल.

★ खासगी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पाचवी ते नववीच्या वर्गात प्राप्त झालेल्या गुणांचा आधार घेतला जाणार आहे.

★ मंडळाला चुकीचा निकाल सादर केल्यास शाळांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

★ प्रशिक्षणानंतर शिक्षकांना विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करण्यासाठी 11 ते 20 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तयार केलेला निकाल समितीकडे सादर केला जाणार आहे.

★ सर्व प्रप्रिया 30 जूनपर्यंत चालणार असून विभागीय व राज्य मंडळ स्तरावरची निकाल तयार करण्याची प्रक्रिया 3 जुलैपासून केली जाईल.

🎯 दरम्यान, शाळा समितीकडून तयार करण्यात आलेला निकाल संगणकप्रणालीमध्ये नोंदवण्याची आणि मंडळाला निकाल गोपनीय पद्धतीने देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!