“त्या” पर्यवेक्षिकेला निलंबित करा; शालेय पोषन आहार प्रकरण…अंगणवाडी कर्मचारी संघटनेची मागणी

0
611

गोंडपिपरी: टाळेबंदीत कोरोना नियमाची ऐसीतैसी करणाऱ्या पर्यवेक्षिकेचा नवा कारनामा समोर आला आहे.अमृत आहार योजना चालविणार्या महीलांकडून अॕडितचा नावाखाली पाचशे रूपये गोळा केल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केला आहे.भ्रस्टाचाराची चौकशी करून पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याची मागणी केली आहे.या आशयाचे निवेदन उपमुख्याधिकार्यांना पाठविण्यात आले आहे.

धाबा येथिल पोषण आहार अपहार प्रकरणात नियमांची ऐसीतैसी करणाऱ्या पर्यवेक्षिका लता ठेमस्कर यांचा नवा प्रताप समोर आला आहे.अमृत आहार योजना चालविणार्या महीलांकडून अॕडिटचा नावाखाली पाचशे रूपये उकडल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटना ( महाराष्ट्र ) यांनी उपमुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. सूनंदा ठाकरे,सूवर्ना चौधरी,भगिरथा सोयाम,निरूपमा डोंगरे,वनमाला उराडे,शिला गेडाम,भारती गेडाम यांच्या कडून ठेमस्कर यांनी पैसे उकडलेत.या प्रकरणाची तक्रार संघटनेने प्रकल्प कार्यालयाला दिली.मात्र तक्रारीची दखल न घेतल्याने पर्यवेक्षिका ठेमस्कर यांची हीमंत वाढल्याचे निवेदनात म्हटले आहे.दरम्यान या प्रकाराची चौकशी करून ठेमस्कर यांना निलंबित करण्याची मागणी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून संघटनेने केली आहे.
दरम्यान याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी ठेमस्कर यांना भ्रमनध्वनीने संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here