बयानासाठी आलेले मुलेही विनामास्क…#पोषण आहार अपहार प्रकरण

554

गोंडपिपरी: पोषण आहार अपहार प्रकरणाची चौकशी ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली.बयान देण्यासाठी आलेल्या बालकांना ग्रामपंचायतेने मास्क दिले नाही.विनामास्क त्या बालकांचे बयान घेण्यात आले.बयानाचा विडीओ ग्रामपंचायत सदस्यानेच सोशल मिडीयावर टाकला आहे.

धाबा येथिल अंगणवाडी क्र.चार येथे पोषण आहार अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली.या प्रकरणाची चौकशी धाबा ग्रामपंचायतेत घेण्यात आली.चौकशीसाठी महीलांनाही बोलाविण्यात आले.या महीलांना मास्क देण्यात आले नाही.विशेष म्हणजे ज्या मुलाला बयान देण्यासाठी बोलाविले गेले त्या मुलंनाही विनामास्कच ठेवल्या गेले.बयाण घेतानांचा विडीओ पुढे आला आहे.यात ग्रामपंचायत सदस्य मुलाला प्रश्न विचारत आहे.त्या मुलाल सोबतच इतरही लहान मुले आहे.त्यांचा तोंडावरही मास्क नाही.