महात्मा गांधी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन आभासी स्वरुपात साजरा…

314

गौरव लुटे (प्रतिनिधी)

आरमोरी –
शिवरायांनी स्वराज्य नंदनवनाची तोरणे रयतेच्या हितासाठी प्राणप्रतिष्ठेने बांधली असे मौलिक विचार कार्यक्रमाचे वक्ते – मा. प्रा. डॉ.विजय रेवतकर सर यांनी सांगितले व खुप मोलाचं मार्गदर्शन केले .ते महात्मा गांधी कला विज्ञान व एन पी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे आभासी स्वरुपात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते . या कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष प्राचार्य डाॅ.लालसिंग खालसा सर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रंचालन प्रियंका ठाकरे यांनी केले.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हिना कावळे गीत व स्वप्नील जुआरे यांनी कविता सादर केली. शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रियंका ठाकरे यांनीच केले.