आईकडून सहा महिन्यांच्या मुलाला बेदम मारहाण…# आईवर गुन्हा दाखल…#नागपुरातील धक्कादायक प्रकार..

0
1040

नागपूर: प्रत्येकच मातेला आपले बाळ प्राणापेक्षाही प्रिय (Every mother loves her baby) असते. प्रचंड यातना सहन करून ती बाळाला जन्म देते आणि तितक्याच लडिवाळपणे त्याला वाढविते. पण पोटच्या 6 महिन्याच्या मुलाला बेदम मारहाण करणारी माता एका व्हिडिओत आढळून येत आहे. सध्या नागपुरातील एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये एक माता आपल्या चिमुकल्या बाळाला प्रचंड मारहाण करत असल्याचे आढळून येत आहे.

ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, कशी एक निर्दयी आई (a ruthless mother) आपल्या 6 महिन्याच्या बाळाला मारत आहे. तिने इतक्या जोरात आपल्याला बाळाला मारले की (She hit the baby so hard) हे कृत्य पाहून कोणत्याही आईला वेदना होतील. परंतु या बाळाच्या जन्मदात्या आईला या वेदना (the mother who gave birth to this baby) का झाल्या नाही? कोणती ही आई इतकी निर्दयी कशी असू शकते? हाच प्रश्न व्हीडिओ पाहून सगळ्यांना पडला आहे.

नागपूरातील पांढराबोडी येथे रहाणाऱ्या कुटुंबातील या लहान बाळाची आजी घरकाम करते, तर वडील ढोलताशा वाजवण्याचे काम करतात. त्या लहाना बाळाच्या आई आणि आजीमध्ये कौटुंबिक वाद झाले. त्यानंतर हा वाद इतका पेटला की, त्या सूनेने आपल्या सासूवरील राग आपल्या बाळावर काढला आणि आपल्या 6 महिन्याच्या बाळाला निर्दयीपणे मारायला सुरवात केली.

हा व्हीडिओ 24 मे रोजीचा असल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी मुलाच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालकल्याण अधिकाऱ्यांसोबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here