अवैधरित्या दारु तस्तरीत चिमूर पोलिसांची कारवाई… 9 लाख 72 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त..

449

चिमूर: चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक 30/05/2021 रोजी पहाटे 3 वाजता सुमारास गोपनिय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करून चिमूर शहराच्या लगत गदगाव MIDC रोडवरील महिंद्रा स्कार्पिओ चारचाकी वाहना चा पाठलाग करून 32 बॉक्समध्ये एकूण 1536 देशी दारूने भरलेल्या प्रत्येकी 180 मि.ली. मापाच्या शिशा किंमत 3,लाख 72 हजार रुपये तसेच एक जुनी वापरती महिंद्रा स्कार्पिओ चारचाकी वाहन किंमत 6,00000 रु. असा एकूण 9 लाख 72 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार चालक व मालकाविरुद्ध अप क्र. 250/21 कलम 65(अ), 83 म.दा.का. नुसार रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.असून सदर कारवाई पोलीस निरीक्षण रविंद्र शिंदे,पोलीस हवालदार विलास निमगडे,पोलीस नाईक कैलास आलाम, भरत पुसांडे, पोलीस शिपाई सचिन खामनकर, कुणाल राठोड यांनी केली.