चिंताजनक: काही दिवसांपासून वायरचा गळफास लागलेल्या वाघाचा पत्ताच नाही…

0
340
Advertisements

वरोरा : मागील आठ दिवसांपासून वायरचा गळफास लागलेल्या अवस्थेत पट्टेदार वाघ पुनर्वसित पळसगावच्या जंगलात असून, त्याचा जीव धोक्यात सापडला आहे. दरम्यान, वनविभागाने शनिवारी ५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ‘सर्च ऑपरेशन’ राबविल्यानंतरही जखमी अवस्थेत असलेल्या वाघाचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे परिसरात दोन पिंजरे लावून रेड्यांना ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

तो फास नायलाॅनचा
तीन दिवसांपूर्वी एका वाघाच्या गळ्यात फास अडकल्याचे लक्षात आले. त्या वाघाचा शोध वरोरा वनविभागाची टीम घेत आहे. वाघाच्या गळ्यात असलेला फास हा नायलाॅनचा आहे. यामुळे वाघाला जीविताला धोका नाही. वाघ दिसताच त्याला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यातील फास काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– एन. आर. प्रवीण,
मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here