प्रेम प्रकरणातून आई वडिलांचा झालेला अपमान लागला जिव्हारी…#तरुणाने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या…

0
871

जालना, 28 मे : प्रेम प्रकरणातून  आई वडिलांचा झालेला अपमान  जिव्हारी लागल्यामुंळ पश्चात्तापातून तरुणानं आत्महत्या केल्याचा प्रकार भोकरदन तालुक्याच्या वालसंगी शिवारत घडला. तरुणानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यानं फेसबूक लाईव्हवर व्हिडिओ करत आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरवू नये असं त्यानं व्हिडिओत म्हटलं आहे.

सिल्लोड तालुक्यातील हत्ती बाहुली गावातील एकवीस वर्षीय तरुण सुमीत किशोर पारधे या तरुणाचे प्रेम प्रकरणातून वाद झाले होते.

काही दिवसांपूर्वी झालेल्या या वादातून त्यांच्या आई वडिलांवर माफी मागण्याची वेळ आली होती. आई वडिलांचा झालेला हा अपमान सुमीत याच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. हा अपमान सहन झाला नाही, आणि आई वडिलांची इज्जत आपण धुळीत मिळवली या अपराधी भावनेनं सुमीतनं आत्महत्या केली.

हा तरुण भोकरदनच्या वालसंगी गावातील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांची दुचाकी पंक्चर झाली. त्यावेळी शिवना गावात नातेवाईत दुचाकी दुरुस्त करण्यासाठी थांबले होते. तेव्हा तरुण गोळ्या आणायला जात असल्याचं सांगून तिथून निघाला. वलसांवंगी शिवारात असलेल्या वनीकरण विभागाच्या झुडपात जाऊन त्यानं गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं फेसबूकवर लाईव्ह करत व्हिडिओवर यामागचं कारण सांगितलं.

तरुणानं त्याच्या व्हिडिओत म्हटलं की, ज्या आई वडिलांच्या डोळ्यात मी आजवर एकदाही पाणी येऊ दिलं नाही, त्यांना माझ्यामुळं खाली पाहावं लागलं. समाजात त्यांचा मोठा अपमान झाला आहे. मी दारु पिऊन खूप चुका केल्या. त्या चुकांसाठी माफी मागतो असंही तो म्हणाले. आई वडिलांच्या अपमानाच्या दुःखाने आत्महत्या करत असून यासाठी कोणालाही दोषी ठरवू नये असं त्यानं व्हिडिओत म्हटलं. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here