गोंडपिपरीतील पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे…#जिल्हाधिकारी कडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी…

518

नागेश इटेकर/ तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राजुरा उपविभाग यांच्या नियंत्रणात गोंडपिपरी शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.यात पाईप लाईन करिता वॉर्डातील बनविलेले सिमेंट काँक्रिट चे रस्ते कंत्रादारांकडून फोडण्यात आले.अनेक महिने लोटून सुध्धा अजूनपर्यंत रस्ते बुजविण्याचे काम पूर्ण झाले नाही.जिथे झाले तिथे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून फोडलेल्या रस्त्यावर काँक्रिट न भरता केवळ मुरुमाचा भरणा करून थातुर मातुर त्यावर कॉक्रेतीकरण करण्यात आले आहे.

अंदाजपत्रकात असलेल्या नियमाला डावलून कंत्राटदार मनमर्जी ने काम चालवत असून विचारणा केल्यास कुठेही तक्रार करा मला सांगू नका.अश्या भाषेत नागरिकांशी हुज्जत घालण्याचा प्रकार देखील कंत्राटदाराकडून अनुभवायला मिळत आहे.त्यामुळे सदर काम थांबवून त्याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी राकेश पुण यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गोंडपिपरी च्या विकासासाठी महाराष्ट्राचे वित्त व नियोजन मंत्री मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी 20 कोटीचा निधी दिला यात शहरातील रस्ते ,नाल्या व सौंदर्य करण्याकरिता 10 कोटी तर शहराची पाणी टंचाईची गंभीर समस्या लक्षात घेता शहराला पाणीपुरवठा व्हावा या उदात्त हेतूने आठ कोटी इतका निधी देऊ केला. गोंडपिंपरी शहरापर्यंत सध्यास्थितीत नळाच्या पाईपलाईनचे काम जवळपास पूर्ण झाले असून सदर काम हे शासकीय नियम अटी व शर्ती डावलून होत असल्याचे चित्र आहे

शहराला पाणी पुरवठा करणारी ही योजना व सध्या स्थितीत सुरू असलेल्या या योजनेचे निकृष्ट दर्जाचे काम यावर अजून पर्यंत कोणाचेही नियंत्रण नसल्याने नागरिकांना भविष्यात फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सदर कामाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी होत आहे.