अभिनंदन! जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा चा सिद्धार्थ चव्हाण अव्वल…

524

राजुरा: महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरपनाच्या वतीने जिल्हास्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वकृत्व स्पर्धेतील विषय गट क्रमांक पहिल्या स्पर्धेकंसाठी शेतकऱ्यांचा आसुळ आणि आजचा शेतकरी व गट क्रमांक दोन साठी ओबीसी जनगणना काळाची गरज असे दोन विषय ठरविण्यात आले.

दोन्ही गटातील ऐकून स्पर्धक ६७ असून सर्व स्पर्धकांनी ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून सहभाग दर्शविला. ही खुली वकृत्व स्पर्धा होती. सदर गट क्रमांक एक मधून श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील बी. ए. तृतीय वर्षात पदवीचे शिक्षण घेत असलेले सिद्धार्थ राहुल चव्हाण या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक ,तर द्वितीय अनिकेत दुर्गे, तृतीय प्रलय म्हशाखेतरी , चतुर्थ प्रतीक्षा वासनिक या स्पर्धकांनी प्रावीण्य मिळवले. दुसऱ्या गटातील प्रथम आकाश कडूकर, द्वितीय रुपेश गोहणे, तृतीय धनराज दुर्योधन, चतुर्थ, अविनाश रामटेक या स्पर्धकांनी पटकावला.