Advertisements
Home चंद्रपूर राजुरा खाजगी रुग्णालयांना पुरवठा ,शासकीय रूण्णालयात तुटवडा का ?#आ.धोटेंचा सवाल ; रेमडेसिविर लसीचा...

खाजगी रुग्णालयांना पुरवठा ,शासकीय रूण्णालयात तुटवडा का ?#आ.धोटेंचा सवाल ; रेमडेसिविर लसीचा पुरवठा करण्याची मागणी

राजूरा: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोनामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर वाढला आहे.अश्या स्थितीत शासकीय रूग्णालयात रेमडेसिविर लसीची निंतात आवश्यकता आहे.मात्र खाजगी रूग्णालयांना मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत असतांना शासकीय रूग्णालयात तुटवडा निर्माण झाला आहे.शासकीय रूग्णालयात रेमडेसिविर लस आणि औषधांचा पुरवठा करण्याची मागणी आमदर सूभाष धोटे यांनी जिल्हाधिकार्यांना केली आहे.

Advertisements

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत चंद्रपूर जिल्ह्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.दरदिवशी हजारो कोरोना बाधित आढळून येत आहेत.तर 20 ते 30 नागरीकांना कोरोनामुळे जिव गमवावा लागत आहे.अश्या स्थितीत रेमडेसिविर लसीची जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात मोठ्या प्रमाणात नितांत गरज आहे.मात्र जिल्हा प्रशासनाकडून खाजगी रूग्णालयांना लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात असतांनाच शासकीय रूग्णालयात मात्र लसीचा तुटवडा असल्याची खंत राजूरा विधानसभेचे आमदार सूभाष धोटे यांनी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
शासकीय रूग्णालयातील रूग्णांवर योग्य वेळी योग्य उपचार होत नसल्याने व वेळीच शासकीय रूग्णालयातील गोरगरिब रूग्णाना रेमडेसिविर लस मिळत नसल्याने अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे.खाजगी रूग्णालयात उपचार करणे गोरगरीबांना परवडणारे नाही.त्यांना शासकीय रूग्णालयाचाच आधार आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या या स्थितीमुळे रेमडेसिविर लस फक्त श्रीमंतांसाठीच आहे काय? असा सवाल नागरीकांकडुन केला जात आहे. यात गरिब व श्रीमंत अशा प्रकारचा भेदभाव होत असल्याचे सामान्य नागरिक आता उघड उघड बोलु लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणे विषयी ग्रामिण भागातील जनतेमध्ये तिव्र असंतोष निमार्ण झालेला आहे.
रेमडेसिविर लस वाटपाबाबत कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन नियोजनबद्द पद्धतीने उपाययोजना करावी. जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना प्राधान्याने रेमडेसीविर लसीचा व औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा,अशी मागणी आमदार धोटे यांनी केली आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा उत्कृष्ठ गणेश देखावा

राजुरा प्रतिनिधी:- नेहमी वनसंरक्षनांच्या व्यस्त कामातून वेळ काढून आपल्या सुप्त कलेला वाव देत दरवर्षी राजुरातील क्षेत्र सहायक संतोष संगमवार सामाजिक विषय घेऊन गणेश देखावा करीत...

लाचेत अडकला तलाठी ; 25 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले

राजूरा प्रतिनिधि :- राकेश कडुकर राजुरा :-रेती पुरविणार्या व्यवसाईकाकडून 25 हजार रूपयाची मागणी करणार तलाठ्याला पैसे स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे.ही कार्यवाही...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सिंधी येथे लंम्पी रोगांवर लसीकरण…

राकेश कडुकर (राजुरा ग्रामीण प्रतिनिधी) राजुरा: तालुक्यातील सिंधी येथे बुधवार दिनांक २८/०९/२०२२ला लंम्पी रोगाला पळवण्यासाठी उपसरपंच रामभाऊ ढुमणे आणि पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ जल्लेवार साहेब...

ब्रेकिंग न्यूज: चंद्रपुरात चार मजली इमारत कोसळली…तीन महिला मलब्यात दबल्याची माहिती..

चंद्रपुर :- शहरातील घुटकाला वार्डातील राजमंगल कार्यालय जवळील पाटील यांची चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यात 3 महिला मलब्यात दबल्याची माहिती...

आ. वडेट्टीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार…शहर काँग्रेस सावलीचा उपक्रम

सावली: गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष निष्ठा जोपासत तन-मन - धनाने काम करणाऱ्या एकनिष्ठ काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते,...

कोट्यावधींच्या विकास कामातून ब्रह्मपुरी तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात…#माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित….#रस्ते ,सांडपाणी नाल्या, शुद्ध पेयजल योजना कामांचे भूमिपूजन व लोकार्पण…

ब्रम्हपुरी: तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील गावखेड्यात दौरा करत असतात. दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!