चंद्रपुर: रात्री भांडण, पहाटे पत्नीच्या डोक्यात घातला रॉड आणि स्वतःही केली आत्महत्या…

0
1302
Advertisements

चंद्रपूर : वैयक्तिक कारणावरून पती-पत्नीच्या झालेल्या भांडणातून आधी पतीने लोखंडी रॉडने पत्नीची हत्या केली. त्यानंतर घरीच गळफास घेऊन स्वत: आत्महत्या केल्याची थरारक घटना कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द येथे घडली. ही घटना आज शुक्रवारी (२३ एप्रिल) पहाटेच्या सुमारास घडली असून अलका सुनिल डवरे (वय २४) आणि सुनील मधुकर डवरे (वय २८) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत.

पोलीसांच्या सुत्रानुसार, सुनील मधुकर डवरे आणि अलका यांचे विवाह झाला असून त्यांना एक चार वर्षाची मुलगी तर एक सहा वर्षाचा मुलगा आहे.

Advertisements

सुनील मधुकर डवरे आपल्या परिवारासह कोरपना तालुक्यातील कोळशी खुर्द येथे राहत होता. काल रात्री मुले झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नी मध्ये वैयक्तिक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. यात पहाटेच्या सुमारास पती सुनील याने पत्नी अलका हिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. त्यात ती ठार झाली. त्यानंतर घरीच पती सुनीलने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले झोपत असताना ही घटना घडल्याने त्यांना याबाबत अजिबात कल्पना नाही.

 दरम्यान, नेहमीप्रमाणे सकाळी उठून डवरे दांपत्य घरची कामे करताना दिसली नाहीत. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी घरी जावून पाहिले असता, पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर पतीचा मृतदेह गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होता.

यानंतर या घटनेची माहिती सर्वप्रथम पोलीस पाटील यांना देण्यात आली. त्यांनी ती माहिती कोरपणा येथील पोलिसांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून दिली. यानंतर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अरुण गुरनुले हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला असून दोन्ही मृतदेह हे कोरपणा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना करता पाठविले आहेत. तसेच याप्रकरणी मृत पती सुनील डवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here