डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दुर्लब, वंचित, उपेक्षित बांधवाना आत्मसन्मान, समानतेची संधी मिळवून दिली- खासदार बाळूभाऊ धानोरकर…

0
170
Advertisements

चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी, वंचित, पीडित यांच्या हक्कांचे संरक्षण केले. त्यांनी नेहमी समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून काम केले आहे. जगात आता सर्वत्र कोरोनाचा विषाणुमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सर्वानी रक्तदान करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समिती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २५ व्यक्तीनी रक्तदान केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदना करण्यात आली.

यावेळी रामू तिवारी शहर अध्यक्ष चंद्रपूर, दिनेशभाऊ चोखारे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर , श्री प्रकाश देवतळे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर काँग्रेस कमिती ग्रामीण, पववनकुमार आगदारी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, अनुसूचित जाती महिला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अश्विनी ताई खोब्रागडे, आसावरी देवतळे, सुभाष गौर, नगरसेवक नंदू नगरकर, नगरसेविका सुनीता लोढीया, नगरसेवक निलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक राजेश अडूर, रोशन पचारे , सुनील पाटील, कुणाल रामटेके, प्रशांत आरवी, राजू रेड्डी, अनुताई दहेगावकर, वंदना भागवत, सुरज बहुरशी, नेहा मेश्राम, कादर शेख, प्रीतम अटेला यांची उपस्थिती होती.

Advertisements

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्ठे विचारवंत, कृतिशील नेते होते. समाजातील दुर्लब, वंचित, उपेक्षित बांधवाना त्यांनी आत्मसन्मान, समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची ताकद दिली असे खासदार बाळू धानोरकर यांनी मत मांडले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली.

यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते प्रवेश केला. त्यात आशिष घाडसे, संघर्ष तावाडे,प्रशांत सुर्यवंशी, तौसिफ पठाण, अक्षय रामटेके, नवनीत अलोने, राहूल पेटकर, प्रशिक दुर्योधन, गुलशन दुर्योधन, हार्दिक बहादूर, निशांत साळवे, विशाल रॉय, प्रणय कुंभारे, अंकित कुंभारे, सचिन शेंडे, रोहित पेटकर, पियुष कुंभारे, अश्विनी कुंभारे, संयोग खोब्रागडे यांच्या समावेश आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here