Home Breaking News दरूर येथील जय श्री माँ भंडारेश्वरी पिठापरी मंदिरातील श्री श्री प्रमोद महाराज...

दरूर येथील जय श्री माँ भंडारेश्वरी पिठापरी मंदिरातील श्री श्री प्रमोद महाराज यांचे निधन…

1726

शरद कुकुडकर (प्रतिनिधी)

गोंडपीपरी: तालुक्यातील दरूर येथे वसलेल्या जय श्री माँ भंडारेश्वरी मंदिरातिल श्री श्री प्रमोदजी महाराज यांचे मंगळवारला रात्रौ 11 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले . आज दिनांक 14 एप्रिल रोज बुधवार ला दरूर येथील मंदिरालगत असलेल्या जागेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळेस गोंडपीपरीचे तहसीलदार, ठाणेदार , वैद्यकीय अधिकारीयांच्यासह मंदिराचे पदाधिकारी सद्यस्य व महाराजांचे भक्त यांच्यात उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक महाराजा च्या मृत्यूने भाविकावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

Don`t copy text!