HomeBreaking Newsचिंता वाढली! चंद्रपुरात गत 24 तासात 784 पॉझिटिव्ह; 342 कोरोनामुक्त तर 9...

चिंता वाढली! चंद्रपुरात गत 24 तासात 784 पॉझिटिव्ह; 342 कोरोनामुक्त तर 9 मृत्यू…

चंद्रपूर, दि. 09 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 324 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 784 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून नऊ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 952 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 260 झाली आहे. सध्या 4227 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 95 हजार 508 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 58 हजार 663 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चिमूर येथील 52 वर्षीय पुरुष व वरोरा येथील 78 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला व 59 वर्षीय महिला, भद्रावती येथील 67 वर्षीय पुरुष, दुर्गापूर,चंद्रपूर येथील 49 वर्षीय पुरुष व 64 वर्षीय पुरूष, बल्लापूर येथील 68 वर्षीय महिला, ब्रम्हापूरी येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 465 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 422, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 784 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 197, चंद्रपूर तालुका 40, बल्लारपूर 64, भद्रावती 35, ब्रम्हपुरी 47, नागभिड 30, सिंदेवाही 22, मूल 19, सावली 16, पोंभुर्णा गोंडपिपरी 6, राजूरा 23, चिमूर 101, वरोरा 118, कोरपना 58, जीवती 1 व इतर ठिकाणच्या 7 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!