16 व्या जनगणनेत आंबेडकर अनुयायांनी धर्म बौद्ध लिहावा- डॉ.भास्कर कांबळे…

546

बल्लारपूर: भारताला स्वतन्त्र मिळाले तेव्हा देशात बौद्धाची संख्या 1कोटि होती. 2011 च्या जनगणनेत ती 86 लाख झाली .बौद्धाची संख्या कमी का झाली? कारण बौद्ध लोक जनगणनेत धर्म बौद्ध लिहितात आणि जात सुद्धा लिहितात. त्यामुळे त्याची जनगणना हिन्दू धर्मात होत गेली.

कारण बौद्ध धर्म हा स्वतन्त्र धर्म आहे. त्या धर्मात जाती नाहीत. म्हणून जात लिहिली की धर्म हिन्दू होतो. म्हणून आम्बेडकरी अनुयायांनी येणाऱ्या जनगणनेत धर्म बौद्ध लिहावा व जातीचा रकाना खुला ठेवावा.आणि भाषेच्या रकान्यात पाली, मराठी, हिंदी, इंग्रजी लिहावे असे प्रतिपादन ड़ॉ. भास्कर काम्बले यांनी केले..

16वी जनगणना व बौद्धाची जबाबदारी या अभियान अंतर्गत बल्लारपुर शहरातील धम्मदीप बुद्धविहार, संतोषी माता वार्ड येथे कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी भास्कर भगत यांनी जातिविहीन समाजरचनेचे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी व आपली बौद्ध म्हणून आइडेंटिटी निर्माण करण्यासाठी जातीचा उल्लेख न करता फक्त बौद्ध असे लिहावे असे आव्हान केले.

यप्रसंगी भंते सत्यपाल हे प्रमुख्याने उपस्थित होते. प्रस्तावित कृष्णमूर्ति रामटेके यानि केले. तर संचालन दीपा चांदेकर यानी केले. कार्यक्रमाला उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.