अभिनंदन! इंटरनॅशनल गणित ऑलिम्पियाड परीक्षेत उदांत निमकर याचे नेत्रदीपक यश…

0
325

चंद्रपूर: जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल गणित ऑलिम्पियाड परीक्षेत उदांत दुशांत निमकर याने ६० पैकी ५६ गुण मिळवून इंटरनॅशनल स्तरावर २९ वी तर राष्ट्रीय स्तरावर २५ वी रँक मिळवत नेत्रदीपक यश मिळविले आहे.

Advertisements

इंटरनॅशनल गणित फाऊंडेशन मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान,गणित,इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयाच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात.या परीक्षांमध्ये अनेक देशातील विद्यार्थी सहभागी होत असतात.या परिक्षांमधील प्रश्नांच्या कठिण्यपातळीचा स्तर उच्च असतो.त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या परीक्षांचे वेगळेच महत्व आहे.

Advertisements

विद्यार्थ्यांना सखोल अभ्यासाची,स्पर्धा परीक्षा देण्याची सवय लागावी आणि राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करता यावी तसेच देशातील रिअल टॅलेंट शोधण्यासाठी या परीक्षांचे आयोजन केले जाते.
चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यातील स्टेला मॅरिस स्कुल,बामनवाडा या शाळेत इयत्ता ५ वी वर्गात शिकणाऱ्या उदांत दुशांत निमकर यांनी जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल गणित ऑलिम्पियाड परीक्षेत हे यश मिळविले आहे याबद्दल गणित ऑलिम्पियाड फाऊंडेशन मार्फत त्याला मेडल ऑफ डीस्टिंकशन व सर्टिफिकेट ऑफ डीस्टिंकशन प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेतही त्याने ६० पैकी ४३ गुण मिळवून इंटरनॅशनल रँक २२२ मिळवत यश संपादन केले आहे तसेच त्याने इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड मध्ये ६० पैकी ३७ गुण मिळविले आहे त्याचसोबत इंटरनॅशनल सामान्य ज्ञान ऑलिम्पियाड मध्ये ६० पैकी ४१ गुण मिळवून ६७९ वा रँक प्राप्त केली आहे.उदांतने मिळविलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल परिसरात सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here