धामणपेठ जंगल कामगार सहकारी संस्थेच्या अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित..#पडद्यामागील सूत्रधार खेमचंद गरपल्लीवार…

0
508
Advertisements

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )–
संचालक मंडळाला विश्वासात नं घेता मनमानी कारभार करणाऱ्या धामनपेठ जंगल कामगार सहकारी संस्थेच्या अध्यक्षांविरुद्ध संचालक मंडळाने आणलेला अविश्वास प्रस्ताव 5विरुद्ध 0मतांनी नुकताच पारित झाला .सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ते खेमचंद गरपल्लीवार यांनी या कामी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की ,धामनपेठ जंगल कामगार सहकारी संस्था नोंदणी क्र 8371,ही बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. संस्थेचे पदाधिकारी ,संचालक ,सदस्य बहुतांश आदिवासी समुदायातले आहेत .
भाऊजी कुडीराम मडावी हे बऱ्याच वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष तथा वासुदेव सातपुते सचिव म्हणून कार्यरत आहेत.
अध्यक्ष भाऊजी मडावी इतर संचालकांना विश्वासात नं घेता मनमानी कारभार करत असल्याची तक्रार संचालकांनी सामाजिक कार्यकर्ते खेमचंद गरपल्लीवार यांच्याकडे केली.
गरपल्लीवार यांनी त्यांना उचित मार्गदर्शन करून अविश्वास प्रस्तावाची नोटीस दाखल करण्याचा सल्ला दिला .तद्नुसार पाच संचालकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे विहित नमुन्यातील अविश्वास प्रस्तावाची नोटीस दाखल केली .
सहकारी संस्थेच्या नियमाप्रमाणे विशेष सभा बोलावण्याचा आदेश गोंडपिपरीच्या सहाय्यक निबंधकांना दिला .
1एप्रिल रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय गोंडपिपरी येथे अविश्वास प्रस्ताव सभा पार पडली .यात अध्यक्ष भाऊजी कुडीराम मडावी यांच्याविरुद्द 5विरुद्ध 0 अशा मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाला .अध्याशी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक पी एस धोटे यांनी काम पाहिले .
काशिनाथ बुधा मडावी ,बाबुराव गंगा कुळमेथे ,मारोती भीमा मंगाम ,मंदाताई दत्तू कुळमेथे ,आनंदीबाई विश्वनाथ कुळमेथे या संचालक मंडळाने अविश्वास प्रस्ताव दाखल करून यशस्वी पणे पारित केला आणि पडद्यामागचे सूत्रधार म्हणून गरपल्लीवार यांनी चोख भूमिका पार पडली .
अधिक चौकशीअंती असे कळते की ,सदर संस्थेच्या सचिवांनी भाबड्या अध्यक्षाना ,काही संचालकांच्या सह्या घेऊन बराच गैरप्रकार गेल्या अनेक वर्षापासून चालवला आहे .अध्यक्ष पायउतार झाल्यावर सचिवाचीही उचलबांगडी होणार असल्याचे कळते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here