Advertisements
बंटी गेडाम (चामोर्शी ग्रामीण प्रतिनिधी)
Advertisements
होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी. होळी/रंगपंचमीचा सण अनेकांच्या आयुष्यात सुख घेऊन येतो. परंतु यावर्षी रंगपंचमी हा सण पिल्ली कुटुंबियासाठी आयुष्यात न विसरण्यासारखे दुःख घेऊन आला.
गडचिरोली जिल्हात चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथील पवन पिल्ली हा युवक मित्रासोबत विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारखंडा घाटावरील चिचडोह येथे दुपारच्या दरम्यान अंघोळी करिता उतरला. तोच त्याचा तोल गेला. त्यामुळे नदीत बुडू लागताच मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पवन पिल्ली नदीत खोल पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहे.
Advertisements
Advertisements