धक्कादायक! भाजप नगरसेविकेच्या मुलाने पिस्तूलाने स्वतःवर झाडून घेतली गोळी..

0
689

पुणे: डोक्यात गोळी झाडून भाजप नगरसेविकेच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवडे नगर, चिंचवड येथे रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे, असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्रसन्ना हा भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा आहे.

Advertisements

प्रसन्न याने कुटुंबियांसमवेत रविवारी रात्री जेवण केले. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं. प्रसन्नला थेरगावयेथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Advertisements

तसेच प्रसन्नचे वडील शेखर चिंचवडे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. याच पिस्तुलातून त्याने गोळी झाडून घेतली आहे.

दरम्यान, प्रसन्नने गोळी झाडून का घेतली तसेच त्याने का आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here