HomeBreaking Newsचकघडोलीच्या सरपंचाची सक्रियता; स्मशानभूमीचे अतिक्रमण हटवले..

चकघडोलीच्या सरपंचाची सक्रियता; स्मशानभूमीचे अतिक्रमण हटवले..

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
मौजा चकघडोली येथील सरपंचाने पदावर आरूढ होताच कामाचा सपाटा सुरु केला आहे .सुमारे 40वर्षापासून अतिक्रमित असलेल्या स्मशानभूमीला त्यांनी अतिक्रमणातून मुक्त केले आहे. चकघडोली येथील सरपंच पोचमलु उलेंदला पदावर आरूढ होताच गावच्या विकासासाठी तळमळीने कार्य करने आरंभले आहे.
चकघडलीच्या स्मशानभूमीच्या जागेवर आजूबाजूच्या मनोज माकोडे ,गणेश हेपट ,रवींद्र हेपट या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते.

गावच्या लोकांच्या तक्रारी होत्या .सरपंच उलेंदला यांनी यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडे तक्रार नोंदवली .तहसीलदार महोदयांनी सदर तक्रारीची दखल घेतली.आणि स्मशानभूमीचे अतिक्रमण काढण्याचा आदेश भूमी अभिलेख कार्यालयाला दिला.

नंतर दि 24मार्च रोजी भूमी अभिलेख कार्यालयाचे सर्वेअर यांनी घटनास्थळी येऊन जागेची मोजणी करून स्मशानभूमीची जितकी जागा होती तितकी जागा काढून दिली. यावेळी गावच्या उपसरपंच ,सारे सदस्य ,गावकरी उपस्थित होते.सुमारे 40वर्षापासूनचा हा प्रश्न सरपंच उलेंदला यांच्या प्रयत्नाने धसास लागल्याने च कघडोलीवासी आनंदले आहेत.आणि सरपंचाचे कौतुक करत आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!