HomeBreaking Newsभावपूर्ण श्रद्धांजली! प्रसिद्ध विचारवंत ऍड. एकनाथराव साळवे यांचे दुःखद निधन...

भावपूर्ण श्रद्धांजली! प्रसिद्ध विचारवंत ऍड. एकनाथराव साळवे यांचे दुःखद निधन…

चंद्रपूर:- ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय डॉ .ऍड. एकनाथराव साळवे (माजी आमदार चंद्रपूर ) यांचे आज दि. 13 मार्च 2021 रोजी दुपारी 1. 20 मिनिटांनी वयाच्या 91 व्या वार्धक्याने निधन झाले.

माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांच्‍या निधनाने ध्‍येयवादी समाजसेवक हरपल्‍याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. लोकप्रतिनिधी या नात्‍याने एकनाथराव साळवे यांनी जनतेच्‍या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करत या जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.

राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या विचारांवर त्‍यांची निस्‍सीम श्रद्धा होती. राजकीय मतभेदाच्‍या भिंती बाजूला सारून त्‍यांनी नेहमीच सर्व पक्षांतील कार्यकर्त्‍यांवर व नेत्‍यांवर स्‍नेह केला व त्‍या माध्यमातून माणसे जोडण्‍याची किमया साधली.

त्‍यांच्‍या या गुण वैशिष्‍टयाच्‍या बळावर मोठा लोकसंग्रह त्‍यांनी निर्माण केला. दूरध्वनी व पत्रव्‍यवहाराच्‍या माध्यमातून मला नेहमी त्‍यांची कौतुकाची थाप मिळायची. तत्‍वनिष्‍ठता हे एकनाथराव साळवे यांचे बलस्‍थान होते. त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्‍दांत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या शोकभावना व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!