ब्रेकिंग न्यूज! सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार…

604

चंद्रपूर: चंद्रपूर वनविभागातील सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना बुधवारी सकाळी आठ वाजता घडली. दादाजी पांडुरंग म्हस्के (६५) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.

सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक १६७९ मध्ये दादाजी पांडुरंग म्हस्के (६५) हे सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करीत त्यांच्या नरडीचा घोट घेतला. माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून गावकऱ्यांना जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत.