धक्कादायक! मुख्याध्यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार…

1994

शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमधील माखरिया नावाची हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दिलीप ढेबे असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी दिलीप ढेबे हा या शाळेचा मुख्याध्यापक आहे. नराधम मुख्याध्यापकाने शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन शाळेत बलात्कार केल्याचे बोललं जात आहे.

त्यामुळे महाबळेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. यानंतर त्या आरोपीला नराधम मुख्याध्यापकला अटक करण्यात आली आहे.