Advertisements
हिंगणा औद्योगिक वसाहतीतील विकोच्या कारखान्याला सोमवारी (दि. ८) पहाटेच्या सुमारास आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्नीशमन विभागाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या घटनेत मोठी वित्त हानी झाली आहे, विकोचे माध्यम व्यवस्थापक श्रीरंग टेंभेकर यांनी याबाबत माहिती दिली.
Advertisements
आगीचे वृत्त कळताच महापालिका अग्नीशमनदलाच्या ६, एमआयडीसीच्या २, वाडी व कळमेश्वर नगर परिषदेची प्रत्येकी १ अशा १० गाड्या आग विझवण्यासाठी रवाना झाल्या. आगीच्या उष्णतेमुळे तळमजल्यासह दोन मजले कोसळले.
पेस्ट तसेच सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी लागणारे मेण व अल्कोहोल तिथे साठवून ठेवले होते. या आगीत ७० टक्के नुकसान झाल्याचे अग्नीशमनदलाने म्हटले आहे.
Advertisements
Advertisements