रेल्वे मालगाडीच्या धडकेने वाघाचा बछडा ठार…

876

बल्लारपूर : बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर मालवाहक रेल्वे गाडीने आज सोमवारी (ता ८) सकाळी ६ वाजता सुमारास वाघाचा बछडा ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा बछडा ६ महिण्याचा असुन बछड्याची रेल्वे लाईन क्रास करताना टक्कर झाल्याने त्याचा मूत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

गोंदिया जिल्ह्यातील पिंडकेपार गराडा बीट लगत नागझीरा अभयारण्य वनपरिसर आहे. या परिसरातुन वन्यजीव प्राण्यांचे भ्रमण होत असते. सोमवारी सकाळच्या सुमारास वाघीण आपल्या बछड्यासह रस्ता क्रास करीत असताना एका बछड्याची त्यावेळी जाणा-या मालवाहक रेल्वे ला जबर धडक लागली. यात बछडा जागीच गतप्राण झाला. सदर घटनेची माहिती वन विभाग गोरेगाव देण्यात आली. वन विभाग अधिका-यांची चमु घटना स्थळी दाखल झाली. त्यांनी बछड्याचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठविला आहे.

बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गाचा बराचसा भाग हा नागझिरा अभयारण्यात येतो. या अभयारण्यात वाघांसह प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हे प्राणी नेहमीच रेल्वे लाईन क्रास करीत असतात. त्यात ब-याच प्रण्यांबाबत अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे या प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाने पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.