HomeBreaking Newsराजकीय ब्रेकिंग! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर...

राजकीय ब्रेकिंग! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर…

मुंबई, 28 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे.

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला.

‘मी राजीनामा देतो पण चौकशी पुर्ण होऊ द्यात. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजूर करा.’ अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यावेळी संजय राठोड प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राजीनामा घ्यावा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते, अखेर त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा संजय राठोड यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खुद्द राठोड यांनीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अखेर संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!