Homeचंद्रपूरप्रदुषणमुक्त भारताचा संदेश देत त्यांनी केला सायकलने २६ दिवसांत ४ हजार किलोमीटरचा...

प्रदुषणमुक्त भारताचा संदेश देत त्यांनी केला सायकलने २६ दिवसांत ४ हजार किलोमीटरचा प्रवास…

चंद्रपुर-चंद्रपूरचे नामदेव राऊत यांच्यासह रविंद्र तरारे, संदिप वैदय, श्रीकांत उके, श्रीकांत रेड्डी, प्रसाद देशपांडे यांनी झाडे लावा, झाडे जगवा, प्रदुषण मुक्त भारताचा संदेश देत सायकल ने २६ दिवसांत ४ हजार किमोमीटरचा प्रवास पार केला आहे. त्यांच्या या उपक्रमा बदल आज सोमवारी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी त्यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, घुग्घूसचे शहर संघटक विलास वनकर, हरमन जोसेफ, मुन्ना रोडे, अशोक खडके यांची उपस्थिती होती.
राऊत यांनी गुजरात येथील द्वारका येथून सायकल प्रवासाला सुरूवात केली. त्यानंतर द्वारका, जामनगर, चित्रोड, पाटण, राजस्थान, माउंट अबू, उदयपुर, अजमेर, जयपूर, दौसा, उत्तरप्रदेश, आग्रा, सौरिख, लखनऊ, अयोध्या, बस्ती, बिहार, गोपाल गंज, फर्वेसगांज, पश्चिम बंगाल, सिलीगुडी, मालबाजर, अलीपुरदुर, आसाम, बारामा, रांगिया, बरसोला, तेजपुर, गोहपुर असा प्रवास करून ते अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे पोहोचल आहे. या प्रवासा दरम्याण त्यांनी प्रदुषनमुक्त भारत चा संदेश दिला. हा प्रवास पूर्ण करुन ते चंद्रपूरात पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी नामदेव राऊत यांच्या निवासास्थानी त्यांची भेट घेवून त्यांचे स्वागत केले. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या इतर सायकरस्वारांचीही उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!