माथा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी..

0
152

आज डॉ ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिका ग्रामपंचायत, माथा ता कोरपना जिल्हा चंद्रपुर च्या वतीने (छत्रपती)शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जी.प.शाळा माथा च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषणे दिली.

तसेच गावातील मान्यवरांनी सुद्धा मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यात सरपंच राजू ठाकरे, किशोर कोहळे,हरिभाऊ ताजने,देवीदासजी कातरकर,अनंत क्षिरसागर,राहुलभाऊ तेलंग,बाळूभाऊ ठाकरे, संजय काळे, राजू खामनकर आदी उपस्थित होते.

तसेच वाचनालयातील विद्यार्थी आकाश शेंडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार प्रदर्शन सुरज निमसरकार यांनी केले. व पंकज सिडाम ,कौतुक अवताडे, यश बेरड व इतर विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here