नितिन गुंडावारांच्या नेतृत्वात बोरी आणि राजपुर पॅच ग्राम पंचायतीवर भाजपचा झेंडा…

0
244

अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी तालुक्यातील बोरी ग्राम पंचायतीच्या संपन्न झालेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे. तर राजपूर पॅच ग्राम पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळुन सत्ता स्थापन केली आहे.

सात सदस्य संख्या असलेल्या बोरी ग्राम पंचायतीत अनुसूचित जमाती पुरुष या राखीव जागेवर भारतीय जनता पक्षाचे शंकर हनमंतू कोडापे यांची सरपंच पदी तर उप सरपंच पदावर पराग ओल्लालवार यांची निवड झाली, तर राजपूर पॅच ग्राम पंचायत मध्ये अनुसुचित जमाती स्त्री राखीव प्रवर्गातून मीना मधुकर वेलादी सरपंच (भारतीय जनता पक्ष) तर उपसरपंचपदी कोकिरवार मॅडम (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) निवड झाली आहे.

अहेरी विधान सभा क्षेत्राचे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )विद्यमान आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम आहेत. आपल्या क्षेत्रातील ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काहीच कसर सोडली नाही. आपल्या सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देत बऱ्याच ग्राम पंचायतीवर त्यांनी आपला झेंडा फडकवला आहे. त्याच प्रमाणे माजी राज्य मंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी सुद्धा आपल्या निष्ठावान आणि विश्वासू सहकाऱ्यांवर यश प्राप्तीची जबादारी सोपवून बोरी आणि राजपुर पॅच सारख्या मोठ्या ग्राम पंचायतिवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून आपला राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

बोरी आणि राजपुर ग्रामपंचायत निवडणूकिची सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते श्री नितीन गुंडावर यांच्या वर सोपवण्यात आली होती. त्यांनी आपली सामाजिक आणि राजकीय ताकत पणाला लावली.त्यात ते शंभर टक्के यशस्वी झाले. चार उमेदवार निवडून आणून राजकारणात ते अग्रेसर असल्याचे विरोधकांना दाखवुन दिले. त्याच प्रमाणे दोन्ही ग्राम पंचायतीवर सरपंच पद मिळवुन पुन्हा एकदा आपला राजकीय वर्चस्व सिध्द करून दाखविले.त्यांच्या या भरीव कामगिरीमुळे नितिन गुंडावारांचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

बोरी ग्राम पंचायतीत विरूद्ध पक्ष म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आणि आ.वी. स. चा एक असे तीन सदस्य राहतील.
राष्ट्रवादीचे युवा नेते श्री महेश बाकिवार यांनी सुद्धा पक्षाचा झेंडा रोवण्यासाठी शरतीचे प्रयत्न केले त्या शर्तीचे फलित त्यांना राजपूर पॅच ग्राम पंचायत उप सरपंचाच्या रुपात मिळाल्यामुळे त्यांच्या कायकर्त्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here