पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या विरोधात बीआरएसपीचे उग्र आंदोलन…

0
236

ब्रम्हपुरी: गेल्या १०-११ महिन्यापासून संपूर्ण देश कोरोना महामारी ने भरडला गेलेला आहे. त्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या कामगारांचे काम ठप्प झाले असून अनेक छोटे-मोठे उद्योग धंदे सुद्धा बंद झालेले आहेत. एकंदरीत संपूर्ण भारतात आर्थिक मंदी निर्माण झाली असताना सुद्धा आपल्या देशात पेट्रोल-डिझेल,गॅस आणि विज दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहेत.

असे असताना देशातील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील महागाई उच्चांकावर पोहोचली आहे. म्हणूनच सरकारचे धोरण सामान्य जनतेला समजावे या हेतूने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी विधानसभा ब्रम्हपुरी तर्फे दिनांक १२.०२.२१ शुक्रवारला मोटर बाईक धक्का मारो आंदोलन तथा महिला आघाडीच्या वतीने चुल पेटवा आंदोलन घेण्यात आले.

आंदोलनाची सुरुवात राजाभाऊ खोब्रागडे चौक ब्रह्मपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रह्मपुरी येथे मोटार गाड्यांना धक्का देत निदर्शने करून एस. डी.ओ.साहेब ब्रह्मपुरी यांच्यामार्फत मा.प्रधानमंत्री भारत सरकार मा.राष्ट्रपती भारत सरकार मा.पेट्रोलीयम मंत्री भारत सरकार मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलना करिता *(बीआरएसपी, महिला आघाडी, युवा आघाडी, विद्यार्थी मोर्चा)* चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनासाठी *नेतृत्व मा. पुनमताई घोनमोडे(प्रदेश संयोजिका) मा.सुखदेवजी राऊत(तालुका प्रभारी) मा. विवेक मेश्राम (युवा आघाडी),मा.राजेंद्र मेंश्राम(तालुका महासचिव),मा. रोशन मेंढे (BRVM)* यांनी केले.

आंदोलनाची सुरुवात *मा.मार्कंडजी बावणे* तर आंदोलनाचे सभा संचालन मा.हंसराज रामटेके व आभार कुमारी मिताली आंबोणे हिने केले. भारती जनबंधू, शिल्पा मेश्राम किशोर प्रधान, अपेक्षा मेंढे, पल्लवी मेश्राम व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून आंदोलन संपन्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here