धक्कादायक! पाळीव कुत्र्याने चाटले आणि मालक मृत्यूमुखी पडले..

0
606
Advertisements

कुत्रा हा माणसाचा अत्यंत प्रामाणिक मित्र आहे. जिभेने अंग चाटून तो त्याचे प्रेम व्यक्त करतो. काही जण त्याच्या या प्रेम व्यक्त करण्याच्या कृतीला दुजोरा देतात. काही वेळा मात्र कुत्र्याची ही प्रेमाची पद्धत व्यक्तिसाठी प्राणघातकही ठरू शकते. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. बर्लिनमधील एका पाळीव कुत्र्याच्या मालकाचा यामुळे मृत्यू झाला आहे.

बर्लिन येथे राहणारी एक 63 वर्षीय व्यक्ती त्याच्या घरात पाळलेल्या कुत्र्यासोबत खेळत होती. त्याच वेळी त्याचा कुत्रा त्याचे प्रेमाने खेळत त्याचा चेहरा चाटत होता. त्यानंतर त्या व्यक्तीची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. कुत्र्याचे हे प्रेम मालकासाठी जीवघेणे ठरले.

Advertisements

कुत्र्यासोबत खेळणाऱ्या त्याच्या मालकाची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमी झाली होती. कुत्र्याच्या चाटण्याने त्याच्या जीभेवरील आणि अंगावरील जिवाणूंनी व्यक्तिवर हल्ला केला. त्याला फ्लूची लागण झाली. त्यामुळे कुत्र्याच्या मालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवस त्याच्यावर उपचार सुरू असताना त्यांची तब्येत फारच बिघडली. त्यानंतर ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्या व्यक्तिचा मृत्यू झाला, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स यांनी दिली आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here