HomeBreaking Newsताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे कंत्राटी तत्वावर पदभरती...

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे कंत्राटी तत्वावर पदभरती…

चंद्रपूर 4 फेब्रुवारी (हिं.स.) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर अकाऊंटन्ट कम टॅली ऑपरेटर व गेट मॅनेजर ची नेमणुक करावयाची आहे. अधिकची माहिती www.mahaforest.gov.in आणि www.mytadoba.org या संकेतस्थळावर व प्रकल्पाच्या विविध कार्यालयामध्ये नोटिस बोर्डावर तपशीलवारपणे दिली आहे.

याबाबत इच्छुकांनी परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, मुल रोड, चंद्रपूर-442401 दुरध्वनी क्रमांक 07172-251414 यांच्या कार्यालयास पोस्टाने /समक्ष/ई-मेल CCffdtadoba2@Mahaforest.gov.in यावर दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे. प्राथमिक छाननीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दुरध्वनी संदेश /पत्र/ ई-मेल द्वारे कळविण्यात येईल, तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक यांनी स्पष्ट केले आहे

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!