ब्रेकिंग न्यूज! विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा…

0
549

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन नाना पटोले यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरच नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पटोले यांनी राजीनामा देण्यापूर्वी सह्यादी अतिथीगृहावर दाखल होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान नाना पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर नाना पटोले यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हटलं, हायकमांडच्या आदेशानंतर मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या संदर्भात अद्याप मला कोणतीही माहिती नाहीये. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी कोण?

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर आता या पदावर कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावरुन विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. काँग्रेस नेते काँग्रेस नेते सुरेश वारपूडकर, अमीन पटेल, अनंतराव थोपटे यांची नावे चर्चेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here