गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथील निर्झरा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने युवकांना क्रीडा प्रकारात आवड निर्माण व्हावी या उद्दात्त हेतूने संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कुळे नेतृत्वात विविध क्रीडा साहित्याचे वितरण केले.
निर्झरा बहुद्देशिया संस्था मागील अनेक वर्षापासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून युवकांना नवी प्रेरणा देण्याचे कार्य विविध उपक्रमातून केल्या जात आहे. सदर क्रीडा साहित्य वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक दहेलकर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक होते, प्रमुख पाहुणे म्हणून अरुण झगडकर, मारोती चौधरी , बळीराज निकोडे, गणेश पिंपळशेंडे , अरुण गावतुरे, रत्नाकर चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पिंपळशेंडे यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा उत्सुक युवकांनी सहकार्य केले.
Advertisements
निर्झरा संस्थेच्या वतीने क्रीडा साहित्याचे वाटप…
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements