Advertisements
Home Breaking News गडचिरोली परिसरात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात इसम ठार...

गडचिरोली परिसरात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात इसम ठार…

गडचिरोली:-गडचिरोली पासुन 15 किमी अंतरावरील धुंडेशिवनी जंगलात सरपण आणन्याकरीता गेलेल्या इसमावर पट्टेदार वाघाने हल्ला केला यात सदर इसमाचा मृत्यू झाला आहे. दयाराम धर्माजी चुधरी वय 67 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. सदर घटना सकाळी 11 ते 11.30 वाजताच्या सुमारास घडली.

Advertisements

ऊल्लेखनीय आहे की वनविभागाने या भागात वाघाचा वावर वाढला असल्यामुळे नागरिकांनी सुदूर जंगलात कोणत्याही कामासाठी जाऊ नये. असे आवाहन केले आहे. या आवाहनाला न जुमानता नागरीक जंगलात दूरवर सरपण, झाडूचे गवत व इतर कामाकरीता जात आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात.

मृतक दयाराम सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह धुंडेशिवनी पासुन 3 ते 4 किमी दूरपर्यंत जंगलात सरपण आणन्याकरीता गेला. सरपण गोळा करीत असताना अचानक पट्टेदार वाघाने त्याचेवर हल्ला चढवला. व त्याला जवळ-जवळ 70 ते 80 मीटरपर्यंत ओढत नेले. व त्याच्या मांडीचे मांस खाल्ले. वाघाचा हा झालेला हल्ला दयाराम सोबतच्या दोन माणसांनी पाहीला. काही क्षणातच त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यामुळे तिथून वाघ पळून गेले. या घटनेची माहिती लगेच वनविभागाला दिली गेली. पोर्ला वनपरिक्षेत्राधिकारी चांगले यांनी ताबडतोब घटनास्थळाकडे जाऊन समीक्षा केली. पोलीसांना घटनेची माहिती दिली असुन पंचनामा सुरू आहे.

वनपरिक्षेत्राधिकारी चांगले यांनी सांगितले की मृतकाचे परिवारास शासकिय नियमानुसार 5 लाख रूपये नगदी व 10 लाख रुपये ठेवीस्वरूपात दिले जातील. ताबडतोब सानुग्रह मदत म्हणून पोर्ला वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून 10 हजार रूपयांची राशी आजच कुटूंबियांना दिली जाणार आहे.

गडचिरोली तालुक्यात वाघाचा वावर वाढला असल्यामुळे नागरिकांनी सुदूर जंगलात कोणत्याही कामासाठी जाऊ नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

तिथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचत नाही…विद्यार्थी कधी ऑटोने तर कधी जातात पिकअप वरती बसून…

बळीराम काळे, जिवती जिवती:(तालुका प्रतिनिधी) माणिकगड पाहाडावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील तसेच जिल्ह्याच्या पश्चिम व दक्षिणेला तेलंगणा राज्याची सीमा लागून असलेला अतिदुर्गम व अतिमागास अशी...

राजुरा मतदारसंघातील कोरपना महिला काँग्रेस ची शहर व तालुका आढावा बैठक

राजुरा: आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात आणि महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 1 डिसेंम्बर पंचशील भवन कोरपना इथे राजुरा...

जुगल एस बोम्मनवार ह्या गडचिरोली जिल्हा भुषण पुरस्कार 2022 ने सन्मानित

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) गडचिरोली:- ग्लोबल स्काॅलरश फाऊंडेशन, पुणे यांच्या कडून राज्य स्तरीय भूषण पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व कृषी तथा उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

तिथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचत नाही…विद्यार्थी कधी ऑटोने तर कधी जातात पिकअप वरती बसून…

बळीराम काळे, जिवती जिवती:(तालुका प्रतिनिधी) माणिकगड पाहाडावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील तसेच जिल्ह्याच्या पश्चिम व दक्षिणेला तेलंगणा राज्याची सीमा लागून असलेला अतिदुर्गम व अतिमागास अशी...

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!