चंद्रपुर:- बहुजनातील कुशल नेतृत्व, शेतकरी , कामगार व बेरोजगार बद्दल जाणीव असणारे व देशात महाराष्ट्राची अस्मिता निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरद पवार साहेब यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून मा .ना.जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री महाराष्ट्रराज्य यांचे हस्ते ,राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष चंद्रपुर , बंडु डाखरे जिल्हाकार्याध्यक्ष ओ बी सी सेल चंद्रपुर व विलास नेरकर अध्यक्ष वरोरा विधानसभा यांचे नेतृत्वात संभाजी ब्रिग्रेड उत्तर चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष जगदीश पिल्लारे ,दक्षिण चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रविण काकडे ,सुनील अरकीलवार सहसचिव संभाजी ब्रिगेड,दिनेश उरकूडे, अतुल ताजणे, संतोष निखाडे यांचेसह शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे चंद्रपुर जिल्ह्यातील राष्ट्रवादीपक्षाला आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी मदत होणार आहे.
Home Breaking News चंद्रपुर जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या दोन जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश…