वाघाच्या हल्ल्यात दोन कालवट आणि एक गाय ठार

826

धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोंगरगांव येथील डोंगरीत आज सकाळी वाघाने हल्ला करून तीन गाय ठार केल्या. या पैकी दोन गाय आनंदराव रामचंद्र झाडे (रा.डोंगरगांव) यांच्या आहेत आणि एक गाय श्रीमती शांताबाई गोविंदा ठाकूर यांच्या आहेत.
वनपरिक्षेत्र कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा चालू आहे. अधीक तपास वनकर्मचारी रायपुरे वनरक्षक करीत आहे. डोंगरगाव परीसरात वाघाची दहशत चालू असून गेल्या सात महीण्यापासून सतत वाघाच्या हल्ल्यात अनेक गायी ठार केले आहेत…
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वाघाच्या दहशतीमूळे गावागावात जनजागृती करायला पाहिजे पण ती जनजागृती अजूनपर्यंत झाली नाही. घटनास्थळी काॅमेरे लावण्यात आले आहेत. लवकरात लवकर पंचनामा करून मृत्यू पावलेल्या गायीच्या मालकाला योग्य ती आर्थीक मदत देण्याची मागणी गाय मालक करीत आहे.