युवकाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

913

चंद्रपूर / कैलास दूर्योधन

पाठाळा येथे दुचाकीने आलेल्या युवकाने फोनवर बोलत असतांना अचानकपणे वर्धा नदीत उडी घेतली. याची माहिती व्हाट्सएपच्या माध्यमातून पसरताच एकच खळबळ उडाली. सदर युवक घुग्घुस येथिल असून अमित पोले असे नाव आहे.

तो WCL बल्लारपूर येथे कार्यरत होता. त्याने शुक्रवारला वणी तालुक्यातील पाठाळा येथील वर्धा नदीचा पात्रात सांयकाळी चार वाजताचा दरम्यान उडी घेतली होती.त्यात त्याचा करून अंत झाला.वणी पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे.
आज ( शनिवार ) दूपारचा सूमारास वणी तालुक्यातील बेलोरा – नीलजय घाट परिसरात अमितचा मृतदेह आढळून आला.
आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास वणी व शिरपूर पोलीस करत आहे.