Home Breaking News घोट येथे स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार; स्वतंत्र घोट तालुका निर्मितीची मागणी

घोट येथे स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार; स्वतंत्र घोट तालुका निर्मितीची मागणी

54

घोट येथे स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार;
स्वतंत्र घोट तालुका निर्मितीची मागणी
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट :
महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ‘काळा दिन’ पाळत घोट येथे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जोरदार एल्गार पुकारण्यात आला.घोट येथील मुख्य चौकात आयोजित या आंदोलनात “स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा” तसेच “घोटला तालुक्याचा दर्जा द्या”अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.आंदोलनात विदर्भ राज्याच्या मागणीसोबतच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नही ठळकपणे मांडण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ आंदोलन संघर्ष समितीचे दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार यांनी केले.यावेळी विलास गण्यारपवार,अंनिसचे कार्याध्यक्ष आसिफ सय्यद,माजी शिक्षक रामचंद्र दुधबावरे,मोतीराम लाटेलवार,दिनकर लाकडे, रमेश श्रृंगारपवार, गिरजाशंकर उपाध्ये,बंडू जुवारे,उमेश सरकार, विश्वास सर, बाबुराव भोवरे,अनिता पोरेड्डीवार, विजयालक्ष्मी गण्यारपवार, बबलू शाहा,गिरिश उपाध्ये,जितेन शाहा, पुरुषोतम चलाख, उद्धव वरफडे,विशाखा सिंह, लिना विश्वास,संगीता वडेटीवार,शामराव चंदनखेडे,पिंकी मेश्राम, ललिता ठाकरे,ताराबाई बावणे,सिंधुबाई आळे, किरण पुल्लीवार,रामदास आबांडरे,सचिन साखरकर,प्रल्हाद निकोडे,आकाश उराडे आदींसह शेकडो विदर्भवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!