पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला राजशिष्टाचाराचा भंग
मनपा आयुक्तांचे तात्काळ निलंबन करा- काँग्रेस नेते प्रवीण पडवेकर यांची मागणी
आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम शासकीय होता आणि याचे आयोजन आयुक्त अकनूरी नरेश यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अशोक उयके यांनी केले. तर प्रमुख उपस्थिती आमदार किशोर जोरगेरवार यांची होती. आज १ मे महाराष्ट्रदिन आहे पण या कार्यक्रमात २०२३ रोजी राज्यगीता ची मान्यता दिलेले महाराष्ट्र गीत मात्र म्हणण्यात आले नाही. त्याच सोबत या देशाचा अभिमान असलेले राष्ट्रगीत सुद्धा म्हणण्यात आले नाही. हा देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचा अपमान तर आहेच. पण त्याच सोबत संयुक्त महाराष्ट्र च्या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. याचा विसर आयुक्तांना तर पडलाच पण त्याच सोबत तिथे उपस्थित पालकमंत्री आणि आमदारांना सुद्धा पडला का? असा प्रश्न सुद्धा काँग्रेस नेते प्रवीण पडवेकर यांनी उपस्थित केला आहे? या मुद्द्यावर पालकमंत्री आणि आमदारांनी तर महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे पण त्याच सोबत राजशिष्टाचाराचा भंग केला म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन अकनूरी नरेश यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नेते प्रवीण पडवेकर यांनी केली आहे..







