Home Breaking News लाहेरी आरोग्य केंद्रातील आशा कू.पार्वती तिमा हे “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न...

लाहेरी आरोग्य केंद्रातील आशा कू.पार्वती तिमा हे “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार” व महाआरोग्य सन्मानाने सन्मानित…

995

लाहेरी आरोग्य केंद्रातील आशा कू.पार्वती तिमा हे “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार” व महाआरोग्य सन्मानाने सन्मानित.

तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार भामरागड

मुंबई येथील नरिमन पॉईंट येथे दि. २२/०२/२०२६ रोजी भव्य दिव्य वातावरणात “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार” तसेच महाआरोग्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथील आशा स्वयंसेविका कु. पार्वती तीमा यांना त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविणे, माता-बाल संगोपन, लसीकरण मोहिमा तसेच विविध आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.


कु. पार्वती तिमा यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्यदक्षता, समर्पण व सेवाभाव जपत नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना “आरोग्य रत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल गडचिरोली जिल्ह्यासह भामरागड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्याचे नाव राज्यभरात गौरवले गेले आहे.
कु. पार्वती तिमा यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌺

Don`t copy text!