भगवंतराव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न.
तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार
एटापल्ली – येथील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्लीच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर एकरा (बु.) येथे उत्साहात पार पडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारतासाठी युवाशक्ती’ या संकल्पनेवर आधारित या शिबिरातून – विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला. एटापल्ली तालुक्यातील एकरा (बु.) येथे ५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबीर कालावधीत सकाळच्या श्रमदानाच्या सत्रात शिबीरार्थी विद्यार्थ्यांव्दारे एकरा बु. गावाच्या पोचरस्त्यावरील क्षतिग्रस्त पुलावरील खड्डे दगड आणि मुरुम टाकून बुजविण्यात आले आणि रस्ता वाहतुकीसाठी सोयीस्कर करण्यात आला. त्याचबरोबर गावातील रस्ता व नाल्यांची साफसफाई करण्यात आली तसेच सांडपाणी वाहून जाण्याची तसेच शोषखड्ड्यांची व्यवस्था करण्यात आली.
तसेच दुपारच्या उद्बोधनाच्या सत्रात विविध विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक श्री. नंदूजी सोनटक्के यांनी ‘आनलाईन बँकींग आणि सरकारी योजना’ या विषयावर मार्गदर्शन केले , तर मुक्तिपथ सर्चचे श्री. किशोर मलेवार यांनी ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर मार्गदर्शन केले तसेच श्री. गजानन साखरे, पोलीस उपनिरीक्षक, एटापल्ली यांनी सायबर गुन्हे आणि कायद्यातील तरतुदी या विषयावर मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सत्रात विविध प्रकारचे मनोरंजनात्मक तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमात “विशेष श्रमसंस्कार शिबिर’ हे केवळ सात दिवसांचे वास्तव्य नसून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची आणि सामाजिक बांधिलकीची एक मोठी संधी असते”.असे प्रतिपादन श्री. पी. व्ही. चौधरी, नायब तहसीलदार, एटापल्ली यांनी केले यावेळी एकरा बु. गावचे पोलीस पाटील श्री . साधूजी दुर्वा तसेच जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीनिवास दासरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन बुटे आणि प्रा. डाॅ. सुधीर भगत यांचे मार्गदर्शन लाभले.
या शिबिराचे यशस्वीतेकरीता रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. संदिप मैंद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा चिन्ना पुंगाटी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा डाॅ. श्रृती गुब्बावार तसेच श्री. मुनेश्वर मोहुर्ले यांनी परिश्रम घेतले. या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डाॅ. बाळकृष्ण कोंगरे, प्रा. डाॅ. शरदकुमार पाटील, प्रा. डॉ. निलेश दुर्गे, प्रा. डॉ. राजीव डांगे, प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. राहुल ढबाले, प्रा. डॉ. साईनाथ वडस्कर, प्रा. डॉ. स्वाती तंतरपाळे, प्रा. अतुल बारसागडे, श्री. सुनील पित्तुलवार, श्री. प्रशांत अडगोपूलवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा डाॅ. श्रृती गुब्बावार यांनी तर प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ संदिप मैंद यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा डाॅ. विश्वनाथ दरेकार यांनी केले.







