जिल्हा संपादक नितेश खडसे
कोजबी (ता. आरमोरी) : १० वर्षीय बालकाचा गळफास घेऊन मृत्यू; आरमोरी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल
आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील १० वर्षीय बालकाचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली. याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक १०/२०२६ अन्वये कलम १९४ भा.ना.सु.सं. अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
मृतकाचे नाव संस्कार विनोद कन्नाके (वय १०, रा. कोजबी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली) असे असून फिर्यादी प्रताप निलकंठ कन्नाके (वय ४०, व्यवसाय शेती, रा. कोजबी) यांनी तोंडी माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास मृतक हा आपल्या राहत्या घरात घराच्या लाकडी आड्याला निळ्या रंगाच्या साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तात्काळ त्याला आरमोरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रात्री ११.३२ वाजता आरमोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस हवालदार किशोर मेश्राम करीत असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.








