Home Breaking News विसामुंडी–मर्दूर रस्त्यावरील पुलाच्या कामात गंभीर त्रुटी; सरपंचांसह ग्रामस्थांचा तीव्र विरोध…

विसामुंडी–मर्दूर रस्त्यावरील पुलाच्या कामात गंभीर त्रुटी; सरपंचांसह ग्रामस्थांचा तीव्र विरोध…

246

विसामुंडी–मर्दूर रस्त्यावरील पुलाच्या कामात गंभीर त्रुटी; सरपंचांसह ग्रामस्थांचा तीव्र विरोध

प्रतिनिधी रवींद्र सदमवार 
विसामुंडी:
ग्रामपंचायत बोटणफुंडी अंतर्गत येणाऱ्या विसामुंडी ते मर्दूर रस्त्यावरील विसामुंडीपासून सुमारे २ किलोमीटर अंतरावरील पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पुलाच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे (Cracks) गेले असून बांधकामात लोखंडी सळ्या योग्य प्रमाणात वापरण्यात आलेल्या नाहीत. तसेच सिमेंटचे प्रमाण कमी व वाळू (रेती) जास्त वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या निकृष्ट कामामुळे पुलाची मजबुती धोक्यात आली असून भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सरपंच श्री. दुलसा मडावी तसेच विसामुंडी येथील ग्रामस्थांनी या कामाला तीव्र विरोध दर्शविला आहे.


सदर पुलाच्या कामाची तात्काळ तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पुलाचे बांधकाम मानकांनुसार पुन्हा करण्यात यावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Don`t copy text!