Home Breaking News ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कटिबद्ध – राष्ट्रीय मानवाधिकार...

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कटिबद्ध – राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली…

124

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कटिबद्ध – राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली.

प्रतिनिधी गौरव बुरांडे

चामोर्शी तालुक्यातील नवेगाव ( रै )येथे शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ सुभाष नगर नवेगाव (रै) यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल अंडरआर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले या आयोजना निमित्त राष्ट्रीय मानवाधिकार संघटना च्या वतीने संघटनेला रबरी बॉल अंडरआर्म क्रिकेट सामना आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या वतीने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी व जिल्हा संघटन नेते प्रवीण भाऊ गेडाम यांचे हस्ते आर्थिक मदत केली यावेळी प्रामुख्याने मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी सांगितले ग्रामीण भागातील विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कटिबद्ध आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेश ईनमवार, उपाध्यक्ष विशाल देउरमले,सचिव अमर आगरे, सहसचिव आकाश गेडाम, कर्णधार लोकप्रिय भांडेकर, चेतन देऊरमले अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!