Home Breaking News आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची भामरागड येथे संघटनात्मक बैठक…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची भामरागड येथे संघटनात्मक बैठक…

93

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची भामरागड येथे संघटनात्मक बैठक

प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार

भामरागड :
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची दक्षिण गडचिरोलीतील भामरागड येथे दिनांक 20 जानेवारी (सोमवार) रोजी महत्त्वाची संघटनात्मक बैठक पार पडली.

या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत व भामरागड तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट अत्यंत मजबुतीने व ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसैनिकांनी एकजुटीने व जोमाने काम करून जनतेचा विश्वास संपादन करावा. जनतेच्या सेवेसाठी शिवसेना नेहमी कटिबद्ध आहे, हा विश्वास निर्माण करून भामरागड तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकवावा, असे आवाहन त्यांनी केले.

अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी सांगितले की, सुधाकर तिम्मा यांच्यासारखे सक्षम व मजबूत नेतृत्व तालुक्याला लाभले असून त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटना अधिक भक्कम होत आहे. आगामी निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एकसंधपणे कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीत पक्ष संघटन बांधणी, विस्तार, सदस्य नोंदणी तसेच आगामी निवडणुकांची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस विनोद पुंगाटी, जगदीश दूर्वा, राणू लेखामी, संतोष पुंगाटी, रामजी मडावी, मनोज वाचामी, मनोज दुर्वा, दिनेश मडकामी, दिलीप गुंगाटी, जग्गू ताडो, संतोष मज्जी, राकेश पिडसे, राजू पिडसे, समरु वेडदा, सुधाकर कुरसामी, बंडू वाचामी, राजू वड्डे, यशवंत पुंगाटी यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Don`t copy text!