Home Breaking News गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या वतिने आयोजित आंतर महाविद्यालयीन संशोधन उत्सव आविष्कार 2026…

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या वतिने आयोजित आंतर महाविद्यालयीन संशोधन उत्सव आविष्कार 2026…

243

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या वतिने आयोजित आंतर महाविद्यालयीन संशोधन उत्सव आविष्कार 2026 मध्ये आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथिल संशोधक विद्यार्थीनी श्रुती प्रभाकर ढाले हीने दुसरा क्रमांक पटकाविला

प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या वतिने आयोजित आंतर महाविद्यालयीन संशोधन उत्सव आविष्कार 2026 येथे पार पडला यामध्ये आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथिल विद्यार्थीनी श्रुती प्रभाकर ढाले हीने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये शुद्ध विज्ञान, मानवशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय विज्ञान, व इतर संशोधन अशा विविध विषया अंतर्गत विद्यापीठातिल अनेक महाविद्यालय सहभागी झाले होते. ही स्पर्धा दोन टप्यात पार पडली, यामध्ये पोस्टर सादरीकरण आणि मौखिक सादरीकरण घेतले गेले. पोस्टर आणि मौखिक प्रेझेंटेशनमध्ये जिंकलेले सहभागी विद्यार्थांची पुढिल राज्यस्तरीय स्पर्धात निवड झाली आहे. पुढील राज्यस्तरीय स्पर्धा हि परभणी येथे २७ ते ३१ जानेवारी २०२६ या दरम्यान पार पडणार आहे.

विशेष म्हणजे आनंद निकेतन महाविद्यालयातील भौतिकशास्त्र येथिल डॉ.निलेश उगेमुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुती प्रभाकर ढाले ही विद्यार्थिनी पीएचडी (संशोधन) करीत आहे. संशोधन करत असताना तिला एस. आर. एफ. महाज्योती फेलोशिप लागू झालेली आहे. या कालावधीमध्ये श्रुतीनी भरघोस अशी उन्नती केली विशेष म्हणजे आत्तापर्यंत तिचे 38 रिसर्च पेपर हे एल्सवेअर ,स्प्रेंजर , स्कोपस इत्यादी जर्नल मध्ये प्रसिद्ध केले आहेत . परंतु श्रुती यावरच थांबली नाही यासोबतच तिचे एक पेटंट , एक कॉपीराईट, एक डिझाईन राईट आणि एक बुक चाप्टर (टेलर अँड फ्रान्सिस मध्ये ) आंतरराष्ट्रीय पातळीवर पब्लिश झालेले आहे . सोबतच नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सुद्धा तिला भरपूर बेस्ट पोस्टर प्रेसेंटेशन चे अवॉर्ड प्राप्त झालेले आहे . अशा या अभ्यासू श्रुतीचे वरोरा मध्येच नाही तर पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात भरभरून कौतुक केले जात आहे .या सर्वांचे श्रेय तिने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे सर , विभाग प्रमुख डॉ. अशोक मिस्त्री सर , डॉ. मोहरील सर , मार्गदर्शक डॉ. निलेश उगेमूगे सर तसेच आई-वडील, बहिन आणि तिला सपोर्ट करणाऱ्या अक्षय पिंपळकर , अश्विनी पूजदेकर ,इसरत अन्सारी , संदीप पारखी सर , डॉ. गोपाल वरुटकर सर अंकित मुंगडे , सुप्रिया क्षेत्रपाल मॅम व शुभम वरुडकर अशा पूर्ण टीम ला दिले आहे .

Don`t copy text!