Home Breaking News एटापल्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व TDC केंद्राचे थाटात उद्घाटन…

एटापल्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व TDC केंद्राचे थाटात उद्घाटन…

212

एटापल्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व TDC केंद्राचे थाटात उद्घाटन

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली 
एटापल्ली :
एटापल्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था एटापल्ली तसेच TDC केंद्राचे उद्घाटन मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक येथील संचालक सैनुजी गोटा यांच्या शुभहस्ते पार पडले.
या उद्घाटन कार्यक्रमाला तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार, नगरसेवक नामदेव हिचामी, अक्षय पुन्घटी, रामा तुमराठी, दिवाकर गावडे, सेवानिवृत्त वनपाल मानापूरे जी, देवानंद हिचामी, गणेश हिचामी, केंद्र चालक इंगळे, ग्रेडर तसेच एटापल्ली केंद्रातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


या प्रसंगी मार्गदर्शन करताना संचालक सैनुजी गोटा यांनी आदिवासी भागातील शेतकरी व लाभार्थ्यांना सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. TDC केंद्रामुळे आदिवासी शेतकऱ्यांना उत्पादन विक्री, साठवणूक व आर्थिक व्यवहार सुलभ होणार असून परिसरातील विकासाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्र चालक व सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटन सोहळ्यानिमित्त परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Don`t copy text!